लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)

लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)

लक्ष असतं माझं या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण दररोज घडणाऱ्या बातम्यांमधील महत्वाच्या विषयावर 'काहीतरी नवीन बातमीच्या पलीकडील' माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत असतो. या कार्यक्रमातून साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी दररोज समाजातील विविध विषयावर त्यांचे परखड मत मांडणार आहेत.

Saam TV is Maharashtra's number one 24-hour news channel 

'Laksha Asta Majha' with renowned TV anchor and Saam's editor in chief Mr Prasanna Joshi. Through the show, Prasanna Joshi discusses his take on all the recent political and current happenings. He also gives his personal views on what is going on in the country and the world. As the name suggests, the show revolves around Mr Joshi's opinion on trending events in the country.

हिंदुराष्ट्राचा नवा नायक...राज ठाकरे?

हिंदुराष्ट्राचा नवा नायक...राज ठाकरे?

हिंदूंचे हिंदूराष्ट्र ही कल्पना तशी जुनी. आता त्याचे नवे समर्थक बनतायत राज ठाकरे. मनसेच्या हिंदुत्ववादी नूतनीकरणानंतर राज ठाकरे आता अयोध्येला जातायत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे आज हिंदू धर्मगुरू, साध्वी आल्या. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

शरद पवार कधी नव्हे इतके राजकीयदृष्टया आक्रमक का झालेत?

शरद पवार कधी नव्हे इतके राजकीयदृष्टया आक्रमक का झालेत?

शरद पवार हे शांत स्वभावाचे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पवार आक्रमक होताना पाहायला मिळतायत. सहकार क्षेत्रावर केंद्राचे अप्रत्यक्ष दडपण असो की लखीमपूर-मावळ वाद, पवार बेधडक बोलतायत. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

एअर इंडिया गेली टाटांकडे मग, प्रॉब्लेम काये?

एअर इंडिया गेली टाटांकडे मग, प्रॉब्लेम काये?

अखेर सरकारी हवाई वाहतूक सेवा एअर इंडिया टाटांकडे गेली. अनेक वर्षे एअर इंडियाचे ओझे सरकारवर होते. मात्र, या खासगीकरणावरून मोठी टीका होतेय. खाजगीकरण इतकं वाईट का ठरवलं जातंय? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

अजित पवार, आजच्या धाडी आणि राजकारण

अजित पवार, आजच्या धाडी आणि राजकारण

आज अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी आणि अन्य ठिकाणी आयकर खात्याने तपास केला. यावरून बराच वाद सुरू झालाय. त्यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

नथुराम, आर्यन आणि लाखीमपूरचं कुणाला पडलंय?

नथुराम, आर्यन आणि लाखीमपूरचं कुणाला पडलंय?

लोक मीडियाला नावं ठेवतात, पण चर्चा मसालेदार बातम्यांचीच करतात. महेश मांजरेकरांचा आगामी 'गोडसे' हा पिक्चर आणि शाहरुखचा मुलगा आर्यनची ड्रग्ज कॉन्ट्रोव्हर्सि ही याचीच उदाहरणं! मग, उत्तर प्रदेशातील लाखीमपूरमध्ये शेतकऱ्यांचं काय झालं, कुणाला फरक पडतो? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

क्रांती जाए भैस चराने, कन्हैया जाए कांग्रेस!

क्रांती जाए भैस चराने, कन्हैया जाए कांग्रेस!

"आझादी, आझादी"च्या घोषणांनी आणि सरकारविरोधी तडाखेबंद भाषणांनी गाजलेला तरुण कन्हैया कुमार अखेर काँग्रेसवासी झालाय. मूळचा डाव्या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेला आणि भाकपमध्येही वरच्या फळीत गेलेल्या कन्हैयाला काँग्रेस हा पर्याय का वाटावा? काँग्रेसवर काळासोबत नसल्याची टीका होत असताना उलट डावेच मागे पडलेत...

पाहिजे जातीचे, इतरांचं आम्हाला कौतुक नाही!

पाहिजे जातीचे, इतरांचं आम्हाला कौतुक नाही!

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला. मोठ्या कष्टाने अनेक मुलं-मुली उत्तीर्ण होऊन आता IAS, IPS होतील. मात्र, त्यांचं कौतुकही जात पाहून होताना दिसलं. जातनिहाय याद्या फिरू लागल्या. अगदी प्रादेशिक अस्मिताही दिसू लागल्या. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं