कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे.  गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत. 
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे. कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा  यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे पॉडकास्ट प्रदर्शित करण्यात येतील. यामध्ये नारदीय कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, वारकरी कीर्तन, तुकडोजी महाराज संप्रदाय कीर्तन, रामदासी संप्रदाय कीर्तन, हरिकथा कीर्तन, दासगणू महाराज संप्रदाय कीर्तन, वैज्ञानिक किर्तन, अन्य संप्रदाय कीर्तन प्रकारांचे सादरीकरण करण्यात येईल.

Kirtan Pravachan is a very rich tradition in Maharashtra and the country. The kirtan tradition has contributed immensely to the enrichment of Indian cultural, religious and spiritual life. Over the last hundreds of years, thousands of kirtankars have worked to nurture the cultural, emotional and mental well-being of many generations.
Kirtan is a great way to spread the message of God, country and religion, to educate the youth. Apart from entertainment, kirtan also introduces us to music, dance, literature, art, history, culture and traditions. Kirtan has an extraordinary power to turn human life around. Podcasts of various types of kirtans will be presented to inculcate love and awareness about kirtan, especially among the younger generation. In this Naradiya Kirtan, Rashtriya Kirtan, Warkari Kirtan, Tukdoji Maharaj Sampraday Kirtan, Ramdasi Sampraday Kirtan, Harikatha Kirtan, Dasganu Maharaj Sampraday Kirtan, Scientific Kirtan, other Sampraday Kirtan types will be presented.

चिलाजी पाटील यांवर कृपा । रामदासी कीर्तन । ह.भ.प. राघवेंद्र देशपांडे

चिलाजी पाटील यांवर कृपा । रामदासी कीर्तन । ह.भ.प. राघवेंद्र देशपांडे

प्रवासामध्ये आपण कोणत्या गाडीची संगत कातो त्याच्यावरुन आपण कधी पोचणार ते ठरते. तसेच भक्तिमार्गात सत संगती कसा लाभ देते याचे निरुपण या कीर्तनात आहे. श्री समर्थ रामदासस्वामी महाराजांनी चिलाजी पाटील यांवर कशी कृपा केली हे सांप्रदायिक आख्यान सांगितले आहे. चार दाणे दान करण्यासाठी कंजुषी करु नये अन्यथा सं...

रंगनाथस्वामी आणि रामदास स्वामी भेट । ह.भ.प. राघवेंद्र देशपांडे

रंगनाथस्वामी आणि रामदास स्वामी भेट । ह.भ.प. राघवेंद्र देशपांडे

श्री संत समर्थ रामदास स्वामींच्या वर्णनासाठी नेहमी एक श्लोक म्हटला जातो. "शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे । वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे । " हा श्लोक कुणी रचला ? या श्लोकाचा अर्थ विस्तारपूर्वक या कीर्तनात सांगितला आहे. त्या बरोबरच समर्थ पंचायतनातील एक महंत श्री रंगनाथ स्वामींची आणि रामदास स्वामींची ...

कल्याण भक्ताची परीक्षा (ब्रह्मपिसा)। ह.भ.प. राघवेंद्र देशपांडे

कल्याण भक्ताची परीक्षा (ब्रह्मपिसा)। ह.भ.प. राघवेंद्र देशपांडे

प्रत्येक मनुष्याला हा अनुभव आहे की कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी काही साधन करावे लागते. अकरावी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणे हे साधन करावे लागते. व त्यासाठी अनेकांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. तसेच परमार्थ साधण्यासाठी सुद्धा साधन करावे लागते. कष्ट घ्यावे लागतात. मार्गदर्शन घ्याव...

श्रीहनुमान जन्म कथा | ह.भ.प. चारुदत्त आफळे

श्रीहनुमान जन्म कथा | ह.भ.प. चारुदत्त आफळे

रंपरेने, रामभक्त श्रीहनुमान हे शक्ती, बुद्धिमत्ता, शिक्षण, शौर्य आणि निर्भयता यांचे प्रतीक मानले जातात. संकटात फक्त हनुमानजींची आठवण येते. त्यांना संकटमोचन म्हणतात. हनुमानास सर्व देवतांनी आशीर्वाद दिला. ते एक दास आणि राजदूत, रणनीतिकार, विद्वान, संरक्षक, वक्ता, गायक, नर्तक, बलवान आणि बुद्धिमान देखील ...

ह.भ.प. मोहनबुवा कुबेर यांची मुलाखत । गप्पा हरिदासांशी

ह.भ.प. मोहनबुवा कुबेर यांची मुलाखत । गप्पा हरिदासांशी

ज्येष्ठ नारदीय कीर्तनकार ह.भ.प. मोहनबुवा कुबेर यांच्याबद्दल आणि त्यांच्या कीर्तनसेवेतील अनुभवांबद्दल जाणून घ्या. गप्पा हरिदासांशी : मुलाखती कीर्तनकारांच्या मुलाखतकार: ह.भ.प. चारुदत्त आफळे कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घे...

रामभक्त भरत परिक्षा । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर

रामभक्त भरत परिक्षा । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर

श्री मोहनबुवा कुबेर यांची कीर्तने म्हणजे नारदीय कीर्तन पद्धतीचा वस्तुपाठ आहेत. तीन कीर्तनांसाठी तीन वेगवेगळे अभंग निरुपणासाठी घेतलेले आहेत. परमार्थ मार्गातील अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. दीन म्हणजे दुबळा नव्हे तर, जो पाशातून सुटण्याची धडपड करतो तो अध्यात्मदृष्ट्या दीन. अशांचा उद्धार भगवंत करतात...

रामभक्त शबरी चरित्र । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर

रामभक्त शबरी चरित्र । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर

रामभक्त शबरी चरित्र । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर श्रीरामभक्त चरित्र सप्ताह श्री मोहनबुवा कुबेर यांची कीर्तने म्हणजे नारदीय कीर्तन पद्धतीचा वस्तुपाठ आहेत. तीन कीर्तनांसाठी तीन वेगवेगळे अभंग निरुपणासाठी घेतलेले आहेत. परमार्थ मार्गातील अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. दीन म्हणजे दुबळा नव्हे तर, जो पाशातून ...

गणेश माहात्म्य भाग २ । ह.भ.प. महेशबुवा काणे

गणेश माहात्म्य भाग २ । ह.भ.प. महेशबुवा काणे

गणेश माहात्म्य भाग २ मोरयाची कृपा । Ganesh Chaturthi । ह.भ.प. महेशबुवा काणे "दे चरणांचा संग - मोरया दे चरणांचा संग ! जप तप साधन काही न घडले होतो मीही अपंग, मोरया " खरंच, पंगुता म्हणजे काय? तर सर्व इंद्रिये जागच्या जागी आहेत. पण काम करत नाहीत. ती अवस्था म्हणजे पंगुता. कान आहेत पण ऐकू येत नाही. डोळे आ...

गणेश माहात्म्य भाग १ । ह.भ.प. महेश बुवा काणे

गणेश माहात्म्य भाग १ । ह.भ.प. महेश बुवा काणे

गणेश माहात्म्य भाग १ दुर्वादेवी कथा । Ganesh Chatrurthi । ह.भ.प. महेश बुवा काणे या गणेश उत्सवाच्या निमित्ताने या सप्ताहातील तिन्ही कीर्तने आपण गणेश महात्म्यावर ऐकणार आहोत. भगवान श्री गणेशाचे परमभक्त - श्री. मुदगल ऋषी. या ऋषींनी गणेशाचे दर्शन-अनुभूती प्राप्त केली व मुदगल पुराणाची रचना केली. या पुराणा...