'मुलगी झाली हो' या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत विलास पाटील हे पात्र साकारून घराघरात पोहोचलेल्या अभिनेते किरण मानेंना अचानक मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला गेला,अन् त्यावरुन सध्या एक मोठं नाट्य घडतंय. सुरुवातीला मानेंनी केलेल्या राजकीय पोस्टवरून वाद झाल्यानं काढून टाकण्यात आल्याचं सांगितलं गेलं. नंतर व्यावसायिक हेवेदावे कारण दिलं गेलं,आणि शेवटी चक्क महिलांशी गैरवर्तन केल्यामुळे काढण्यात आल्याचं बोललं जाऊ लागलं. हे कारण दिल्यानंतर मात्र पुरोगामी विचारांच्या किरण मानेंनी म्हटलंय,'मरेपर्यंत न्यायासाठी दाद मागेन'. 'ईसकाळ'ला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत तर त्यांनी एका अशा नावाचा खुलासा केलाय ज्यानं त्यांना धमकीही दिली होती. कोण आहे हा धमकी देणारा शादाब शेख?काय आहे या प्रकरणातील कनेक्शन्स?किरण माने न्यायासाठी पुढे काय करणार? त्यासाठी ऐका सकाळ Unplugged कार्यक्रमात अभिनेते किरण माने यांची थेट मुलाखत.