अभिनेत्री शिल्पा तुळसकर सध्या तू तेव्हा तशी या मालिकेतून पुन्हा आपल्या भेटीस आली आहे. मालिकेतील तिच्या अनामिका या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. शिल्पानं मराठी-हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग दोन्हीकडे आहे. शिल्पानं खूप वेगवेगळ्या भूमिका मालिका-सिनेमातून साकारल्या आहेत. आपण सिनेमे का कमी केले,किंवा आपल्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या भूमिका खूप लहान वयात का केल्या,आपल्या खऱ्या आयुष्यातील पट्या अशा अनेक मुद्द्यांवर शिल्पा तुळसकरनं सकाळ पॉडकास्टच्या माध्यमातून भरभरुन संवाद साधला आहे.